मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – एप्रिल 2025 हप्त्याचे अपडेट्स, अटी, आणि नवीन बदल
लाडकी बहीण योजना:महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा थेट त्यांच्या खात्यावर आर्थिक मदत दिली जाते. सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे, तो म्हणजे एप्रिल 2025 चा हप्ता. हा दहावा हप्ता कधी मिळणार, कोणाला किती रक्कम मिळणार, यामध्ये काय बदल झालेत – हे सर्व आपण या लेखात समजून घेणार आहोत.

एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी मिळणार?
आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेच्या शुभदिनी, लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी जे महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांनाही एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच तो रक्कम मिळणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना यावेळी दुहेरी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
2100 रुपयांचे आश्वासन कुठे गेले?
महायुती सरकारकडून काही महिन्यांपूर्वी महिलांना दरमहा 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्य अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली असून, अद्याप या बदलाबाबत अधिकृत अपडेट मिळालेला नाही.
काही महिलांना फक्त 500 रुपयेच मिळणार – का?
सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की, “नमो किसान सन्मान निधी” या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये दरमहा दिले जातील.
कारण काय?
नमो किसान सन्मान योजनेत:
- केंद्र सरकारकडून: ₹6,000 वार्षिक
- राज्य सरकारकडून: ₹6,000 वार्षिक
म्हणजेच एकूण ₹12,000 वर्षाला मिळतात. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेत ₹18,000 मिळतात (₹1,500 x 12 महिने). त्यामुळे जे महिलांना आधीपासून नमो किसानचा लाभ मिळतो, त्यांना योजनेअंतर्गत केवळ उर्वरित फरक म्हणजे दरमहा ₹500 मिळणार आहे.
कोण पात्र आहेत?
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी खालील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात:
- महिला महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहणारी असावी.
- तिचं वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावं.
- वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
- ती महिला आयकरदाता नसावी.
- स्वतःचं बँक खातं असणं अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक महिलांनी खालील वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा:
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/
अर्ज करताना लागणारी कागदपत्रं:
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक (IFSC कोडसहित)
- रहिवासी दाखला
- वयाचा दाखला
- पॅन कार्ड (असल्यास)
- फोटो
एप्रिलच्या हप्त्याशी संबंधित महत्त्वाच्या सूचना:
- 30 एप्रिल 2025 रोजी हप्ता जमा होणार आहे. जर तो दिवस बँक बंद असेल, तर पुढील कामकाजाच्या दिवशी पैसे जमा होतील.
- लाभार्थ्यांनी आपले बँक खाते सक्रीय ठेवावे आणि त्यातील KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.
- काही महिलांना बँकांकडून पैसे येण्यासाठी 1-2 दिवस उशीर होऊ शकतो, त्यामुळे घाई न करता थांबावं.
- मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज न आल्यास, जवळच्या बँकेत जाऊन खातं तपासणं आवश्यक आहे.
माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून चालवली जाणारी सर्वात मोठी महिला कल्याण योजना आहे. यामध्ये दरमहा आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होते. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर येणार असून, काही महिलांना यामध्ये केवळ ₹500 मिळणार आहेत. यामागे सरकारच्या धोरणामध्ये केलेले अलीकडचे बदल कारणीभूत आहेत.
योजनेबाबत अधिक माहिती व अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ येथे भेट द्या –
🔗 https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मोफत पिठाची गिरणी योजना 2025: ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग
PM Surya Ghar Yojana 2025: घरगुती सौर ऊर्जा योजना पॅनल बसवण्यासाठी मिळणार तब्बल ७८,००० रुपये